संगमेश्वर बसस्थानकात निवाराशेडअभावी विद्याथीं, नागरिकांची गैरसोय

Jul 18, 2024 - 16:50
 0
संगमेश्वर बसस्थानकात निवाराशेडअभावी विद्याथीं, नागरिकांची गैरसोय

संगमेश्वर : संगमेश्वर बसस्थानकात अनेकजण दररोज प्रवास करत असतात; मात्र पावसाळ्यात येथील बसस्थानकात प्रवाशांना उभे राहण्यासाठी पक्की शेड उभारलेली नसल्यामुळे भरपावसात छत्र्या उघडून उभे राहण्याची वेळ आली आहे. वेगवान पाऊस असेल तर वयोवृद्ध प्रवाशांना तिथे उभे राहणे जिकिरीचे होते. शाळकरी विद्यार्थ्यांची गैरसोय होते. याकडे प्रशासन गांभीयनि पाहणार आहे का, असा प्रश्न प्रवाशांनी उपस्थित केला आहे.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील संगमेश्वर येथील बसस्थानक सुशोभीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे प्रवाशांना उभे राहण्यासाठी तात्पुरत्या निवाराशेड उभारण्यात याव्यात, अशी मागणी केली होती. अखेर तात्पुरत्या निवाराशेड उभारल्या आहेत; मात्र पावसाळ्यात शेडवर किमान प्लास्टिक टाकणे आवश्यक होते जेणेकरून प्रवाशांना बसची वाट पाहत उभे राहणे सुकर झाले असते.

तात्पुरत्या उभारण्यात आलेल्या शेडवर प्लास्टिक नसल्याने पावसात छत्र्या उघडून उभे राहून बसची वाट पाहावी लागत आहे. काम सुरू असल्यामुळे जिकडेतिकडे साहित्य ठेवण्यात आले आहे. त्यामुळे आधीच त्या परिसरात जागा कमी आहे. त्यामुळे बसस्थानकामध्ये येणाऱ्या प्रवाशांना कसरत करावी लागते. महामंडळानेही वाऱ्यावर सोडले असल्याची खंत प्रवाशांकडून व्यक्त केली जात आहे. 

कोकणात मोठ्या प्रमाणात चाकरमानी ये-जा करत असतात. संगमेश्वर बसस्थानकात मुंबई, पुणे, गोवा, कोल्हापूर आदी शहरांकडे जाण्यासाठी प्रवासीवर्ग संगमेश्वर बसस्थानकात येत असतो. सद्यःस्थितीत संगमेश्वर बसस्थानकाचे काम सुरू आहे. त्यामुळे बसस्थानकात येणाऱ्या प्रवाशांना थांबण्यासाठी निवाराशेडवर प्लास्टिक टाकून ती संरक्षित करणे आवश्यक होते. मुसळधार पाऊस वाढत असल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी देवरूख आगारप्रमुख आणि विभाग नियंत्रकांकडे केली आहे.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
05:18 PM 18/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow