शेअर मार्केट, बँका ते विमानसेवा, मायक्रोसॉफ्ट सर्व्हर डाऊनमुळे जगभरातील सेवा ठप्प!

Jul 19, 2024 - 15:52
 0
शेअर मार्केट, बँका ते विमानसेवा, मायक्रोसॉफ्ट सर्व्हर डाऊनमुळे जगभरातील सेवा ठप्प!

मुंबई : जगातील सर्वांत मोठ्या कंपन्यांपैकी एक असलेल्या मायक्रोसॉफ्टच्ये सेवा शुक्रवारी (19 जुलै) ठप्प पडल्या. एक सॉफ्टवेअर अपडेट होत असताना विंडोज 10 या ऑपरेटिंग सिस्टिमवर परिणाम पडला.

त्यामुळे सामान्य लोकांवर तर प्रभाव पडलाच. पण जगभरातील वेगवेगळ्या क्षेत्रांवरही या तांत्रिक बिघाडाचा परिणाम झाला. वेगवेगळ्या क्षेत्रातील कामे बंद पडली. विशेष म्हणजे या बिघाडाचा ड्रेडिंगवरही परिणाम झाला.

या क्षेत्राला सर्वाधिक फटका

मायक्रोसॉफ्टचं सर्व्हर डाऊन झाल्यामुळे त्याचा परिणाम जगभरातील विविध क्षेत्रांवर झाला. यामध्ये विमानसेवा, बँकिंग, फायनान्स, स्टॉक एक्स्चेंज, माध्यमे, टीव्ही चॅनेल्स, ऑनलाईन स्टोअर्स, हॉस्पिटल्स तसेच आयटी क्षेत्राला या तांत्रिक बिघाडाचा फटका बसला. जगभरात मायक्रोसॉफ्ट ऑपरेटिंग सिस्टिम वापरणाऱ्यांची संख्या बऱ्यापैकी आहे. त्यामुळे अचानकपणे मायक्रोसॉफ्टचे सर्व्हर डाऊन झाल्यामुळे त्याचा फटका अनेक क्षेत्रांवर बसला. या बिघाडामुळे अनेक कंपन्यांची कामे ठप्प पडली.

भारतात 'या' कंपन्यांवर पडला परिणाम

मायक्रोसॉफ्टचं सर्व्हर डाऊन झाल्यामुळे सर्वाधिक फटका हा विमानसेवेला बसला. देशातील जवळपास सर्वच विमान सेवा देणाऱ्या कंपन्या मायक्रोसॉफ्ट ऑपरेटिंग सिस्टिमवरच काम करतात. अकासा, इंडिगो, एअर इंडिया, विस्तारा, स्पाईस जेट आदी कंपन्याला या सर्व्हर डाऊनचा फटका बसला. दिल्लीतील विमानांचे उड्डाण उशिराने झाले. आंतरराष्ट्रीय पातळीवरदेखील विमानवाहतूक सेवा कोलमडली. अमेरिकेत फ्रंटियर एअरलाईन्स, एलेजिएंट, सन कंट्री आदी कंपन्यांची विमानसेवा प्रभावित झाली.

शेअर मार्केटवरही परिणाम, ट्रेडिंग करताना अडचणी

मायक्रोसॉफ्टच्या सर्व्हर डाऊनचा ड्रेडिंगवरही परिणाम झाला. अनेकांना शेअर्स खरेदी-विक्री करता आली नाही. अनेक ड्रेडिंग प्लॅटफॉर्मसवर ट्रेडिंग करताना आंत्रिक अडचणी जाणवत होत्या. ब्रोकरेज फर्म 5पैसा, आयआयएफएल सिक्योरिटीजच्या सिस्टिमवर प्रभाव पडला होता.

लंडन स्टॉक एक्स्चेंजच्या सेवेवर परिणाम

मायक्रोसॉफ्ट या कंपनीचे जगभरातील सर्व्हर डाऊन झाल्यामुळे जगभरातील अनेक देशाच्या वेगवेगळ्या सेवा प्रभावित झाला. या तांत्रिक अडचणीमुळे भारतीय शेअर बाजारावर तर परिणाम झालाच पण लंडन स्टॉक एक्स्जेंचवरही या सेवेचा परिणाम झाला. मिळालेल्या माहितीनुसार मायक्रोसॉफ्टच्या सर्व्हर डाऊनची अडचण सर्वांत अगोदर अमेरिकेत दिसून आली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:06 19-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow