दादा कोंडकेंचे क्लासिकल 'ब्लॅक अँड व्हाइट' मराठी चित्रपट रंगीत रूपात !

Jul 24, 2024 - 14:04
Jul 24, 2024 - 14:53
 0
दादा कोंडकेंचे क्लासिकल 'ब्लॅक अँड व्हाइट' मराठी चित्रपट रंगीत रूपात !

मुंबई : मराठी सिनेसृष्टीत आपले वेगळे स्थान निर्माण करणारे, चित्रपटातून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे दादा कोंडके यांचे चित्रपट आजही लोकप्रिय आहेत. ब्लॅक अॅण्ड व्हाईटमध्ये रिलीज झालेल्या दादा कोंडके यांच्या चित्रपटांचा आजही चाहता वर्ग आहे.

आता, दादा कोंडकेंचे क्लासिकल 'ब्लॅक अँड व्हाइट' मराठी चित्रपट रंगीत रूपात प्रेक्षकांना पाहता येणार आहे. झी टॉकीजवर हे चित्रपट पाहता येणार आहे.

दादा कोंडके यांच्या काही लोकप्रिय आणि अविस्मरणीय चित्रपटांना झी टॉकीजने रंगीत स्वरूपात सादर करून प्रेक्षकांना नवीन आनंद दिला आहे."पांडू हवालदार", "आंधळा मारतो डोळा", "एकटा जीव" आणि "सोंगाड्या" हे दादा कोंडके यांचे चित्रपट आता झी टॉकीजवर रंगीत स्वरूपात पाहायला मिळणार आहे.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:14 PM 24/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow