रत्नागिरी : साखरपा, कोंडगाव पुरमुक्त; गाळ उपशाचा परिणाम

Jul 27, 2024 - 15:27
Jul 27, 2024 - 15:32
 0
रत्नागिरी : साखरपा, कोंडगाव पुरमुक्त; गाळ उपशाचा परिणाम

साखरपा : रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत असून अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. साखरपा गावातून वाहणारी काजळी नदी मात्र संथ लपीत वाहत असल्यामुळे ग्रामस्थ चिंतामुक्त आहेत. २०२१ मध्ये या नदीतील गाळ उपसा केल्याने पात्र खोल झाल्याने साखरपा, कोंडगाव पुरापासून दूर राहिले आहेत.

मुसळधार पाऊस आणि साखरपा ग्रामस्थांची झोप उडणे हे समीकरण काही वर्षांपूर्वीपर्यंत नित्याचे झाले होते. आंबाघाटातून उगम पावणारी काजळी नदी साखरपा बाजारपेठेला लागून वाहते. या नदीचे पात्र गाळामुळे पूर्ण भरून गेले होते. त्यामुळे सलग पाऊस पडल्यानंतर पाणी बाजारपेठेत शिरत होते. यामध्ये दुकानदारांचे मोठे नुकसान होत होते. २०२१ मध्ये या नदीतील गाळ उपसण्यात आला. 

भडकंबा पूल ते पुर्ये पूल या एक ते दीड किमीच्या पट्टयातील गाळ उपसा करण्यात आला. या कामात दत्त देवस्थान, दत्तसेवा पतसंस्था या स्थानिक संस्थांच्या पुढाकाराला कोंडगाव ग्रामपंचायत आणि नाम फाउंडेशनने सहकार्य केले. या उपशामुळे नदीचे पात्र रुंदावले आणि त्याची खोलीही वाढली.

त्यामुळे गेली तीन वर्षे नदीला पूर आलेला नाही. दोन वर्षांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीतही कोंडगाव बाजारपेठ सुरक्षित राहिली. गेले आठ दिवस सर्वत्र पूरपरिस्थिती असली तरी साखरपा परिसरात काजळी नदी संथपणे वाहताना दिसत आहे. काजळी नदीला पुढे काही गावादरम्यान पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे; परंतु कोंडगाव आणि साखरपा गावे मात्र पुरापासून मुक्त झाली आहेत.

नदीचे पात्र व खोली वाढली
मुसळधार पाऊस आणि साखरपा ग्रामस्थांची झोप उडणे हे समीकरण काही वर्षांपूर्वीपर्यंत नित्याचे झाले होते. आंबाघाटातून उगम पावणारी काजळी नदी साखरपा बाजारपेठेला लागून वाहते. या नदीचे पात्र गाळामुळे पूर्ण भरून गेले होते. स्थानिक संस्थांच्या पुढाकाराला कोडगाव ग्रामपंचायत आणि नाम फाउंडेशनने सहकार्य केले. गाळ उपशामुळे नदीचे पात्र रूंदावले आणि त्याची खोलीही वाढली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:55 PM 27/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow