गणेशोत्सवासाठी चिपळूणला विशेष रेल्वे गाडी सोडावी; जल फाऊंडेशची मागणी

Jun 4, 2024 - 10:10
Jun 4, 2024 - 10:27
 0
गणेशोत्सवासाठी चिपळूणला विशेष रेल्वे गाडी सोडावी; जल फाऊंडेशची  मागणी

खेड : मुंबईतून रत्नागिरी, सावंतवाडी, मडगाव, मंगळुरुप्रमाणेच चिपळूणसाठीही स्वतंत्र गणपती सणाकरिता विशेष गाडी सोडावी, अशी मागणी जल फाऊंडेशनने रेल्वे मंत्री तसेच मध्य रेल्वे व कोकण रेल्वेकडे केली आहे.

चिपळूण, खेड, महाड, माणगाव विभागातील प्रवाशांना स्वतंत्र गाडी नसल्यामुळे कोकण रेल्वे मार्गावरील सर्वच प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. यामुळे लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये गर्दी होऊन सर्वांनाच अडचणीचा सामना करावा लागतो. गावातून मुंबईला येताना आतील प्रवाशांनी दरवाजे आतून बंद केल्यामुळे खेड व त्यापुढील प्रवाशांना गाडीत चढताच येत नाही.

काही वेळेस आरक्षण असलेल्या प्रवाशांची गाडीही चुकते. त्यामुळे मुंबई गाठताना प्रवाशांची दमछाक होते. त्यामुळेच गेल्या अनेक वर्षांपासून दादर व चिपळूण दरम्यान स्वतंत्र गाडी सोडण्याची मागणी होत आहे. त्याकडे दुर्लक्ष करून रेल्वे प्रशासन केवळ गणेशोत्सव व होळीच्या काळात पनवेलवरून चिपळूण गाडी सोडत आहे.

गणेशोत्सवाह होणारी गर्दी लक्षात घेता मुंबई शहरातून रत्नागिरी, सावंतवाडी, मडगाव, मंगळुरुप्रमाणेच चिपळूणसाठीही स्वतंत्र गणपती विशेष गाडी सोडावी अशी मागणी जल फाउंडेशनने रेल्वे मंत्री, मध्य रेल्वे व कोंकण रेल्वेकडे केली आहे, अशी माहिती जल फाऊंडेशनचे नितीन जाधव यांनी दिली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:38 AM 04/Jun/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow