विधानपरिषदेच्या नवनिर्वाचित सदस्यांचा २८ जुलै रोजी शपथविधी

Jul 26, 2024 - 12:25
 0
विधानपरिषदेच्या नवनिर्वाचित सदस्यांचा २८ जुलै रोजी शपथविधी

मुंबई : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत नवनिर्वाचित झालेल्या सदस्यांचा शपथविधी रविवार २८ जुलै २०२४ रोजी सकाळी ११ वाजता विधानभवनातील मध्यवर्ती सभागृहात (सेंट्रल हॉल) होणार आहे.

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे या नवनिर्वाचित सदस्यांना शपथ देतील. विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी १२ जुलै २०२४ रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. निवडून आलेले सदस्य योगेश टिळेकर, पंकजा मुंडे, परिणय फुके, अमित गोरखे, सदाभाऊ खोत, भावना गवळी, कृपाल तुमाने, शिवाजीराव गर्जे, राजेश विटेकर, मिलिंद नार्वेकर, प्रज्ञा सातव या सदस्यांचा शपथविधी होईल, असे कळविण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:50 26-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow