शिक्षकांवरील अन्यायाविरोधात १२ जूनला शिवसेना कार्यकर्ते महेश मोरे यांचे उपोषण

Jun 6, 2024 - 12:16
 0
शिक्षकांवरील अन्यायाविरोधात १२ जूनला शिवसेना कार्यकर्ते  महेश मोरे यांचे उपोषण

खेड : जिल्हा बँकेच्या खेडमधील शाखेतील एका अधिकाऱ्याकडून खेडमध्ये कर्जदार शिक्षकांना त्रास देण्यात येत आहे. त्यांची तालुक्यातून तातडीने हकालपट्टी करावी व शिक्षकांना न्याय मिळावा म्हणून १२ जूनला खेड तहसील कार्यालयासमोर उपोषण करणार असल्याचे शिवसेना कार्यकर्ते महेश मोरे यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले आहे.

शिक्षक जीवन कोकणी यांचा यापूर्वी पगार जिल्हा बँकेत होता. त्या वेळी त्यांनी बँकेकडून पगार तारण कर्ज घेतले होते. त्यानंतर त्यांचा पगार बढतीनंतर एका राष्ट्रीयीकृत बँकेच्या शाखेतील खात्यात जमा होत असे. मधल्या कालावधीत काही कौटुंबिक अडचणीमुळे त्यांचे रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतून काढलेले कर्ज थकीत राहिले. बँकेने नियमानुसार कारवाई करून कर्ज वसुलीसाठी कोकणी यांची सर्व बँक खाती गोठवली. त्यानंतर जिल्हा बँक उपाध्यक्ष बाबाजीराव जाधव यांच्या बरोबर आम्ही बैठक घेतली असता त्या बैठकीत कर्जदारांना त्यांना नियमित हफ्ते भरता यावे यासाठी त्यांचा पगार जिल्हा बँकेच्या खेड शाखेत वर्ग करण्यात यावा, अशी सूचना केली. त्या वेळी जिल्हा बँकेत पगार जमा होऊ लागल्यावर त्यांची इतर खाती पुन्हा सुरू करण्याबाबत चर्चा झाली होती; मात्र त्यानंतरही इतर खाती आर्थिक व्यवहारासाठी खुली केली नाहीत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:41 PM 06/Jun/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow