आयफोन झाले स्वस्त!

Jul 27, 2024 - 14:03
 0
आयफोन झाले स्वस्त!

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी 23 जुलै रोजी मोबाईल फोन, चार्चर यांच्यावरील सीमाशुल्क कमी करण्याचा निर्णय घेतला. अर्थसंकल्प सादर करताना त्यांनी तशी घोषणा केली.

दरम्यान, या घोषणेनंतर आता जगप्रसिद्ध अॅपल या कंपनीने मोबाईल फोनची किंमत कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. या कंपनीने आयफोनच्या सर्वच सिरिजवरील किंमत 3 ते 4 टक्क्यांनी कमी करण्याची घोषणा केली आहे. केंद्राने सीमा शुल्कात 20 ते 15 टक्के घट केल्यानंतर अॅपलने हा निर्णय घेतला आहे.

आयफोन 13, 14 आणि 15 च्या किमतीत झाली घट

ॲपल (Apple) कंपनीने दिलेल्या माहितीनुसार आता या कंपनीच्या प्रो, प्रो मॅक्स यासारखे महागडे फोन 5100 रुपयांपासून ते 6000 रुपयांनी स्वस्त झाले आहेत. मेड इन इंडिया आयफोन (iPhone) 13, 14 आणि 15 च्या दरातही साधारण 300 रुपयांपर्यंत घट झाली आहे. यासह आयफोन एसई (iPhone SE) च्या किमती 2300 रुपयांनी कमी झाल्या आहेत. ॲपल कंपनीने पहिल्यांदाच आपल्या प्रो मॉडेल्सच्या किमतीत घट केली आहे.

...तर किंमत कमी केली जायची

अर्थमंत्र्यानी सीमाशुल्कात घट केल्यानंतर ॲपल कंपनीनेही लगेच आपल्या मोबाईलच्या दरात घट केली आहे. याआधी एखादा नवा फोन लॉन्च करायचा असेल तेव्हाच ॲपल कंपनीकडून त्यांच्या इतर मोबाईलच्या किमतींत घट केली जायची. नवे मॉडेल लॉन्च झाल्यानंतर या कंपनीकडून जुने प्रो मॉडल बंद करण्यात यायचे. काही मोजके डिलर्स स्टॉक क्लियर करण्यासाठी आयफोनवर सूट द्यायचे. पण यावेळी ॲपल कंपनीनेच आपल्या आयफोनच्या इतर मॉडेल्सच्या किंमती कमी केल्या आहेत.

आयफोनचे नवे दर काय?

आयफोन एसई (iPhone SE) - 47600 रुपये
आयफोन13 (iPhone 13) - 59,600 रुपये
आयफोन 14 (iPhone 14) - 69,600 रुपये
आयफोन 14 प्लस (iPhone 14 Plus) - 79,600 रुपये
आयफोन 15 (iPhone 15) - 79,600 रुपये
आयफोन 15 प्लस (iPhone 15 Plus) - 89,600 रुपये
आईफोन 15 प्रो (iPhone 15 Pro) - 1,29,800 रुपये
आयफोन 15 प्रो मॅक्स (iPhone 15 Pro Max) - 1,54,000 रुपये

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:32 27-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow