रौप्य महोत्सवी कारगिल विजय दिवस कार्यक्रम लायन्स क्लब रत्नागिरी, माजी सैनिक संघटना आणि रा.भा. शिर्के प्रशाला यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न

Jul 27, 2024 - 13:45
 0
रौप्य महोत्सवी कारगिल विजय दिवस कार्यक्रम लायन्स क्लब रत्नागिरी, माजी सैनिक संघटना आणि रा.भा. शिर्के प्रशाला यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न

रत्नागिरी : आज रा.भा. शिर्के प्रशाला रत्नागिरी लायन्स क्लब व जिल्हा सैनिक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने 26 जुलै चा रोप्य महोत्सवी कारगिल विजय दिवस प्रशालेमध्ये संपन्न झाला.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांचे स्वागत करीत दीपप्रज्वलनाने करण्यात आली. सुरुवातीला शहीद सैनिकांना अमर जवान स्टॅचू समोर श्रद्धांजली पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. त्यानंतर रा भा शिर्के प्रशालेतील विद्यार्थ्यांनी कारगिल विजयी गीताचे गायन केले. श्री राजेश आयरे सर यांनी मान्यवरांचा परिचय व स्वागत केले. श्री केडी कांबळे सर रा. भा .शिर्के प्रशालेचे मुख्याध्यापक यांनी उपस्थित सर्व माजी सैनिकांना व लायन्स क्लब चे सदस्य यांचे गुलाब पुष्प देऊन हार्दिक स्वागत केले. 

प्रास्ताविकामध्ये आयरे सर यांनी कारगिल विजयातील ची पार्श्वभूमी विशद केली व यानिमित्ताने जे माजी सैनिक उपस्थित होते. त्यांच्या कार्याचा आढावा घेतला. श्री गणेश धुरी लाईन्स क्लब रत्नागिरीचे अध्यक्ष यांनी माजी सैनिकांचा लायन्स क्लब यांच्या वतीने हार्दिक सत्कार केला. रा. भा शिर्के व लायन्स क्लबच्या यांच्या संयुक्त विद्यमाने वक्तृत्व व निबंध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत बक्षीस पात्र विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. त्यानंतर लाईन्स क्लबच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना पारितोषिकांचे वितरण करण्यात आले.

कारगिल विजय दिनानिमित्त रा.भा. शिर्के प्रशालेमध्ये वक्तृत्व स्पर्धा व निबंध स्पर्धा आयोजित केल्या होत्या सदर स्पर्धेतील क्रमांक प्राप्त विद्यार्थी खालील प्रमाणे:

 वक्तृत्व स्पर्धा 
1) कु.ऋषिकेश सचिन गोवळकर
2) कु .क्षितिज समीर रहाटे
3) कु .दामोदर शंकर मेलगे 
4) कु .पार्थ धनंजय सरफरे 
5) कुमार पार्थ मंगेश रणसे

 निबंध स्पर्धा 
 गट क्रमांक एक, 9 वी
1) कुमारी आदिती सुरेश सनगरे
2) कुमारी पूर्वा शैलेश भुवड 
3) कुमारी हर्षदा तुषार महाकाळ 
4) कुमारी भक्ती अरविंद मोरे 
5) कुमारी गौरी अशोक बांदेकर 
6) कुमारी आर्या गजानन थुळ

 निबंध स्पर्धा 
गट दोन, 10वी 
1) कुमारी सिद्धी अर्जुन सुतार
2) कुमारी अनुष्का राकेश घडशी
3) कुमार संप्रह हेमंत यादव
4) कुमार शिवम विकास तावडे
5) कुमारी शरयू विजय कांबळे

पारितोषिक वितरणानंतर श्री गणेश धुरी यांनी लायन्स क्लबच्या वतीने मनोगत व्यक्त करताना माजी सैनिकांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. यानंतर या कार्यक्रमांमध्ये प्रमुख वक्ते म्हणून श्री लक्ष्मण तानाजी गवळी यांनी विद्यार्थ्यांना कारगिल दिनाची माहिती सांगितली भारतीय सैनिक आणि त्यांच्या जबाबदाऱ्या याविषयीची जाणीव निर्माण करून देणे भारतीय सैन्या विषयी माहिती दिली. 

या कार्यक्रमात माझी निवृत्त सैनिक श्री मोहन दाजी सातव, श्री शंकर रामा मिलके, श्री विजय सिताराम आंबेकर, प्रसाद सुधाकर कुलकर्णी, विष्णू तुकाराम जाधव, महेंद्र मधुकर सुर्वे, हेमंत अनंत देसाई, नितेश वामन शिरसाठ, लक्ष्मण तानाजी गवळी, अमृत शिवाजी पाटील, रामचंद्र देमाजी सावंत, साहेबराव बोरगे हे उपस्थित होते. लायन्स क्लबचे श्री विशाल ढोपळे श्री अमेय विरकर, श्री पराग भांडवलकर, एडवोकेट महेंद्र मांडवकर, श्री शरद नागवेकर,श्री सुमित ओसवाल, पानवलकर मॅडम उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती गुरव मॅडम यांनी केले. कार्यक्रमाचे आभार श्री आर. वाय कांबळे सर यांनी केले. त्यानंतर राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:14 27-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow